बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमार नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असतो. यंदाचं संपूर्ण वर्ष अक्षयनं बॉलिवूड गाजवलं आहे.
यावर्षी त्याचे 4 सिनेमा रिलीज होत आहेत. यापैकी केसरी आणि मिशन मंगल हे 2 सिनेमे रिलीज झाले असून त्याचा बहुचर्चित सिनेमा 'हाउसफुल 4' सुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या सिनेमाची पोस्टर नुकतंच रिलीज झाली. ज्यात अक्षय कुमारसह इतर कलाकराही मजेशीर अंदाजात दिसत आहे.अक्षय कुमारनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर या 'हाउसफुल 4'ची पोस्टर शेअर केली.
यातील एका पोस्टरमध्ये अक्षय कुमार बाण खेचलेल्या पोझमध्ये दिसत आहे. यावर बाला शैतान का साला असं लिहिलं आहे.
तर दुसऱ्या पोस्टरमध्ये एक तो कॅज्यूअल कपड्यांमध्ये एका पोर्ट्रेटच्या बाजूला उभा असलेला दिसत आहे. याशिवाय अक्षयनं इतर कलाकरांचे लुक सुद्धा शेअर केले आहेत.
अभिनेत्री कृती सेनन सुद्धा राजकुमारी मधूच्या वेशात दिसत आहेत. तर दुसऱ्या पोस्टरमध्ये कॅज्यूअल वेअरमध्ये दिसत आहे.
अभिनेता बॉबी देओल एका पोस्टरमध्ये अंगरक्षक धर्मपुत्राच्या तर दुसऱ्या पोस्टरमध्ये सिंपल लुकमध्ये पाहायला मिळत आहे.
अभिनेता रितेश देशमुखचा लुक सर्वात मजेशीर आहे. रितेश या सिनेमात नर्तकी बंगडू महाराज यांची व्यक्तीरेखा साकरताना दिसणार आहे.
अभिनेत्री पुजा हेगडे या सिनेमात राजकुमारी मालाच्या भूमिकेत दिसणार आहे. एकूण काय तर हाउसपुल 4 मध्ये प्रत्येक कलाकाराचा डबल रोल आहे.
अभिनेत्री किर्ती खाबरदांडा सुद्धा मीना आणि नेहा अशा डबल रोलमध्ये दिसत आहे. हा सिनेमा येत्या दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.