बॉलिवूडचा लोकप्रिय गायक-रॅपर हनी सिंगची तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ दिसून येते.
हनी सिंगने आपल्या कलेच्या जोरावर म्युझिक इंडस्ट्रीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
हनी सिंग सध्या आपल्या 'हनी सिंग 3.0' च्या माध्यमातून पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या ऍल्बममुळे सध्या तो प्रचंड चर्चेत आहे.
परंतु तत्पूर्वी हनी सिंग कायद्याच्या कचाट्यात सापडताना दिसून येत आहे.
विवेक रमण नावाच्या एका व्यक्तीने मुंबई पोलिसांत हनी सिंगविरुद्ध गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
या व्यक्तीने तक्रार करत मारहाण, किडनॅपिंगसारखे गंभीर आरोप केले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विवेकने 15 एप्रिल रोजी हनी सिंगच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं.
परंतु पैशाच्या देवाणघेवाणीत झालेल्या घोटाळ्यामुळे त्याने हा कार्यक्रम रद्द केला होता.
त्यामुळे नाराज झालेल्या हनी सिंगने आपल्या काही मित्रांच्या समवेत आपलं किडनॅपिंग करुन एका हॉटेलात बंदी बनवून ठेवलं होतं. शिवाय जबर मारहाणसुद्धा केल्याचा आरोप विवेकने केला आहे.