देशभरात होळीचा-रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.
सर्वसामान्य लोकांपासून सेलेब्रेटींपर्यंत सर्वजण रंगात न्हाऊन निघत आहे.
दरम्यान सेलिब्रेटी विविध होळी-रंगपंचमी पार्ट्यांचं आयोजन करताना दिसून येत आहेत.
टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैनने नुकतंच एका जंगी रंगपंचमीच्या पार्टीचं आयोजन केलं होतं.
'अनवी की रासलीला' असं या पार्टीला खास नाव देण्यात आलं होतं.
अंकिता लोखंडेने पार्टीमध्ये पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती.
तर दुसरीकडे पती विकीने पिवळ्या रंगाचा कुर्ता परिधान केला होता.
या पार्टीमध्ये टीव्ही जगतातील जवळजवळ सर्व सेलिब्रेटी सहभागी झाले होते.
या दोघांच्या रंगपंचमीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.