NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / हिना खानचं राखी सेलिब्रेशन, युजर्स म्हणाले मुस्लीम असून ईद विसरलीस का?

हिना खानचं राखी सेलिब्रेशन, युजर्स म्हणाले मुस्लीम असून ईद विसरलीस का?

ईदच्या दिवशी रक्षाबंधन साजरं करणं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण हिनाला खूपच महागात पडलं.

  • -MIN READ

    Last Updated: August 14, 2019, 15:00 IST
17

सध्या बॉलिवूड आणि टीव्ही कलाकारांमध्ये सध्या रक्षाबंधनाची खूप क्रेझ दिसून येत आहे. यात टीव्ही अभिनेत्री हिना खान मागे नाही. तिनं बॉयफ्रेंड रॉकी जैस्वालच्या बहिणींकडून राखी बांधून घेत 2 दिवस अगोदर सेलिब्रेशन केलं.

27

हिनानं या सेलिब्रेशनचे काही फोटो तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले. ज्यामुळे सध्या तिच्या या फोटोंची सोशल मीडियावर खूपच चर्चा सुरू आहे. हिना आणि रॉकीच्या या सेलिब्रेशनचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

37

हिनानं यंदाचं रक्षाबंधन बॉयफ्रेंड रॉकी आणि त्याच्या बहीणींसोबत साजरं केलं. यावेळी रॉकीच्या बहीणींनी हिनालाही तिलक लावून राखी बांधली. तसंच तिला आशीर्वादही दिला. हे सर्व फोटो हिनानं प्री-राखी सेलिब्रेशन म्हणून इन्स्टाग्रामवर अपलोड केले.

47

मात्र अशाप्रकारे रक्षाबंधन साजरं करणं आणि त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण हिनाला खूपच महागात पडलं. तिच्या या फोटोंमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल काही नेटिझन्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.

57

दोन दिवसांपूर्वी हिनानं जेव्हा हे सेलिब्रेशन केलं. त्यादिवशी नेमकी ईद असल्यानं हिनाचे हे फोटो सोशल मीडियावर वादाचं कारण ठरले. ज्यामुळे हिनानं या फोटोचा कमेंट ऑप्शन ब्लॉक करून टाकावा लागला.

67

हिना खान मुस्लीम असल्यानं तिनं अशा प्रकारे रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करणं अनेकांना रुचलेलं नाही. असं करुन हिनानं धर्माचा अपमान केल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.

77

याशिवाय ईदच्या दिवशी हिनानं ईद सेलिब्रेशन केलं नाही मात्र रक्षाबंधन सेलिब्रेट केलं यावरुनही तिला ट्रोल करण्यात आलं. त्यानंतर तिनं आणखी एक फोटो शेअर केल्यानंतर ट्रोलर्सनी या फोटोवर आक्षेपार्ह कमेंट करायला सुरुवात केली.

  • FIRST PUBLISHED :