साऊथ सुपस्टार विजय देवरकोंडाने अगदी कमी वेळेत अफाट लोकप्रियता मिळवली आहे. विजयचा मोठा चाहतावर्ग आहे. आज अभिनेता आपला वाढदिवस साजरा करत आहे.
विजय देवरकोंडाने 2011 मध्ये आलेल्या 'नुविल्ला' या तेलुगू चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.
विजय देवरकोंडाला खरी ओळख 'अर्जुन रेड्डी' या चित्रपटाततून मिळाली होती. या चित्रपटानंतर विजयने कधीही मागे वळून नाही पाहिले. अभिनेत्याने रश्मिकासोबत सुपरहिट चित्रपट दिले आहेत.
आज विजय देवरकोंडा साऊथ इंडस्ट्रीत एका चित्रपटासाठी तब्बल 12 कोटींचं मानधन घेतो.
विजयचं हैद्राबादमध्ये आलिशान घर आहे. जिथे तो आपल्या कुटुंबासोबत राहतो. या घराची किंमत जवळपास 15 कोटी असल्याचं सांगितलं जातं.
विजय देवरकोंडाच्या एकूण संपत्तीबाबत सांगायचं झालं तर, रिपोर्ट्सनुसार अभिनेत्याजवळ 35 कोटींची संपत्ती आहे.
याशिवाय विजय देवरकोंडाजवळ फारच महागड्या कार आणि बाईक्सचं कलेक्शन आहे.