मराठी-हिंदी अभिनेत्री वर्षा उसगांवकर आज आपला ५५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमिताने चाहते-सेलिब्रेटी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
या वयातही वर्षा उसगांवकर अतिशय सुंदर आणि स्टायलिश दिसतात. भल्याभल्यांना लाजवेल असं त्यांचं सौंदर्य आहे.
वर्षा उसगावकरांनी अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. तसेच त्या अनेकवेळा वादात सापडल्या आहेत.
फारच कमी लोकांना माहिती असेल की, त्याकाळात या मराठमोळ्या अभिनेत्रीने टॉपलेस फोटोशूट करत खळबळ माजवून दिली होती.
वर्षा या नेहमीच आपल्या स्टायलिश आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जातात.
परंतु त्यांनी एका इंग्लिश मॅगझीनसाठी टॉपलेस फोटो क्लिक करत सर्वांनाच धक्का दिला होता.
या फोटोशूटमुळे त्यांच्यावर प्रचंड टीकासुद्धा झाली होती. हा वाद चांगलाच गाजला होता.
वर्षा उसगांवकर सध्या छोट्या पडद्यावर कमाल करत आहेत. तसेच त्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय आहेत.