NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Tina Ambani Birthday:'त्या' घटनेने टीना मुनीम-अनिल अंबानींना आणलं जवळ; फिल्मी आहे Love Story

Tina Ambani Birthday:'त्या' घटनेने टीना मुनीम-अनिल अंबानींना आणलं जवळ; फिल्मी आहे Love Story

Happy Birthday Tina Ambani: बॉलिवूडच्या लोकप्रिय आणि अतिशय सुंदर अभिनेत्री टीना मुनीम आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत.

18

बॉलिवूडच्या लोकप्रिय आणि अतिशय सुंदर अभिनेत्री टीना मुनीम आज आपला वाढदिवस साजरा करत आहेत.

28

टीना मुनीम यांच्या व्यावसायिक आयुष्याबाबत अनेकांना माहिती आहे. परंतु अनेक लोक त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात.

38

टीना मुनीम यांच्या खाजगी आयुष्याबाबत सांगायचं झालं तर त्यांनी उद्योगपती अनिल अंबानी यांच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

48

टीना आणि अनिल यांची लव्हस्टोरी फारच रंजक आहे. त्यांची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी कथेसारखी वाटते.

58

अनिल अंबानींनी एका फॅमिली फंक्शनमध्ये टीना यांना पहिल्यांदा पाहिलं होतं. पाहताच क्षणी ते त्यांच्या प्रेमात पडले होते.

68

त्यांनतर त्यांच्यात बोलणं सुरु झालं. टीनासुद्धा त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत होत्या. दरम्यान काही कौटुंबिक कारणाने या दोघांनीही एकमेकांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला.

78

परंतु १९८९ मध्ये अमेरिकेतील, लॉस अँजेलिसमध्ये मोठा भूकंप झाला होता. यावेळी टीना त्याठिकाणी होत्या. अनिल यांनी मोठ्या प्रयत्नांनी फोन नंबर मिळवून टीना ठीक आहेत का? जाणून घेण्यासाठी त्यांना फोन केला. आणि फक्त तुम्ही कशा आहात? इतकंच विचारुन फोन ठेवला.

88

टीनासुद्धा त्यांच्या या प्रेमाने आणि काळजीने थक्क झाल्या. त्यांनी परत अनिल यांच्याशी बोलणं सुरु केलं. आणि पुढे एकेमकांच्या कुटुंबाच्या संमतीने त्यांनी लग्नगाठ बांधली.

  • FIRST PUBLISHED :