ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची लेक आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आज आपला वाढदिवस साजरा करत आहे.
सोनाक्षी सिन्हाला इंडस्ट्रीतील बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. तिच्याबाबत नेहमीच काही ना काही रंजक गोष्टी ऐकायला मिळत असतात.
अनेकांना माहिती नसेल की, इंडस्ट्रीत येण्यापूर्वी सोनाक्षी सिन्हाचं वजन प्रचंड वाढलं होतं. अभिनेत्रीने योग्य वेळी मेहनत घेत आपल्या फिटनेसवर लक्ष दिलं होतं.
बॉलिवूड पदार्पण करण्यापूर्वी सोनाक्षी सिन्हाचं वजन ९० किलो इतकं होतं. परंतु पहिल्या सिनेमावेळी सोनाक्षीने तब्बल ३० किलो वजन कमी करत इंडस्ट्रीत डेब्यू केला होता.
या धावपळीच्या जगात स्वतः चा फिटनेस सांभाळणं फारच गरजेचं आहे. वाढत्या वजनासोबत अनेक व्याधी जडण्याची शक्यता असते. सुंदर दिसण्यासाठी नव्हे तर आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी फिटनेस आवश्यक आहे.
सोनाक्षी सिन्हाने इतकं वजन कसं कमी केलं असा प्रश्न अनेकांना पडतो. सोनाक्षीने उघड केलं होतं की, तिच्या वेट लॉस जर्नीत सलमान खानने तिला मदत केली आहे.
शिवाय अभिनेत्रीने यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. एक्सरसाईजशिवाय सोनाक्षीने योग्य डाएट फॉलो केला होता. माहितीनुसार, अभिनेत्री त्यावेळी भाजी-भाकरी, सॅलड,ग्रीन टी, ड्रायफ्रूट्स असे हलके फुलके पदार्थ खात होती.