NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Sana Saeed B’day: 'कुछ कुछ होता है' फेम अंजली आता दिसतेय अशी; बोल्डनेस पाहून तुम्हीही म्हणाल OMG

Sana Saeed B’day: 'कुछ कुछ होता है' फेम अंजली आता दिसतेय अशी; बोल्डनेस पाहून तुम्हीही म्हणाल OMG

अभिनेत्री सना सईद आज तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण आजही लोक तिला अंजलीच्या भूमिकेमुळे ओळखतात. शाहरुख खान, सलमान खानसोबत 'कुछ कुछ होता है' चित्रपटात अंजलीची भूमिका साकारणारी सना इतकी बदलली आहे की, तिला पाहून तुम्ही थक्क व्हाल.

18

अभिनेत्री सना सईद आज तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण आजही लोक तिला अंजलीच्या भूमिकेमुळे ओळखतात. शाहरुख खान, सलमान खानसोबत 'कुछ कुछ होता है' चित्रपटात अंजलीची भूमिका साकारणारी सना इतकी बदलली आहे की, तिला पाहून तुम्ही थक्क व्हाल.

28

सना सईद एक अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीत काम केलं आहे. बालकलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या सनाचा जन्म 22 सप्टेंबर 1988 रोजी मुंबईत झाला होता. सनाने 'कुछ कुछ होता है' या चित्रपटातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. आपल्या क्युट लुकने प्रेक्षकांना भुरळ घालणारी सना आता मोठी झाली असून ती फारच ग्लॅमरस झाली आहे.

38

सना सईदने शाहरुख खान, सलमान खान, काजोल, राणी मुखर्जी स्टारर 'कुछ कुछ होता है' या चित्रपटात अप्रतिम अभिनय केला होता. या चित्रपटात अंजली नावाच्या मुलीची भूमिका साकारून सना एका रात्रीत स्टार बनली होती.

48

यानंतर सनाने 'हर दिल जो प्यार करेगा' आणि 'बादल' या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. पण अचानक सना चित्रपटांमधून गायब झाली होती. बराच काळ पडद्यापासून दूर राहिल्यानंतर सनाने टीव्ही शोमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.

58

2008 मध्ये सना 'बाबुल का आंगन छुटे ना' सारख्या मालिकांमध्ये दिसली होती. याशिवाय ती 'झलक दिखला जा' या रिऍलिटी शोमध्ये सहभागी झाली होती.

68

त्यानंतर सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री बनलेल्या सना सईदने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटात काम केलं होतं. मात्र या चित्रपटात तिला 'कुछ कुछ होता है'सारखी लोकप्रियता मिळवता आली नाही.

78

सना सईद सध्या चित्रपट आणि मालिकांपासून दूर असली तर ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

88

सना सतत आपले बोल्ड आणि बिनधास्त फोटो शेअर करत चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते.

  • FIRST PUBLISHED :