NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Birthday Special : वयाच्या 65व्या वर्षी रेखा यांचं सौंदर्य कायम, काय आहे त्यांचं ब्युटी सिक्रेट

Birthday Special : वयाच्या 65व्या वर्षी रेखा यांचं सौंदर्य कायम, काय आहे त्यांचं ब्युटी सिक्रेट

आजही आपल्या सौंदर्यानं सर्वांना घायाळ करणाऱ्या रेखा आज 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत.

110

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका, आलिया, सोनम, सारा फिटनेससाठी रोज जिममध्ये घाम गाळताना दिसतात. आपली स्किन आणि फिटनेसाठी या अभिनेत्री प्रचंड जागरुक आहेत. पण बॉलिवूड अभिनेत्री रेखा यांच्या सौंदर्याची सर कोणलाच येणार नाही. वयाच्या 65 व्या वर्षीही त्यांचं सौंदर्य तरुण अभिनेत्रींना लाजवेल असंच आहे.

210

आपल्या अबाधित सौंदर्यानं सर्वांना घायाळ करणाऱ्या रेखा आज 65 वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यानिमित्त जाणून घेऊयात त्यांच्या या सौंदर्याचं रहस्य

310

सुंदर त्वचा आणि दाट केस यामुळे आजही कौतुकास पात्र ठरणाऱ्या रेखा त्यांच्या फिटनेससाठी प्रचंड मेहनत घेतात. ज्या वयात फिटनेस सांभाळणं सर्वांना कठीण जातं. त्या वयात रेखा यांनी त्यांचा फिटनेस खूपच उत्तम प्रकारे सांभाळला आहे.

410

स्पॉटबॉय-ईनं प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रेखा एक स्पेशल डाएट प्लान फॉलो करतात. याशिवाय त्या नियमित व्यायामही करतात. पण या सर्वात त्यांच्या रोजच्या जीवनात पाणी सर्वात म्हत्त्वाचं वाटतं. त्या रोज 10-12 ग्लास पाणी पितात. त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी आणि डिटॉक्स करण्यासाठी पाणी सर्वात महत्त्वाचं आहे असं रेखा यांना वाटतं.

510

रेखा रोज संतुलित डाएट घेतात. यात जंक फूड खायला अजिबात परवानगी नाही. त्या नेहमी कमी मसाले आणि तेल घातलेल्या भाज्यांचा त्यांच्या जेवणात समावेश करतात. याशिवाय त्यांच्या जेवणात चपाती आणि दही यांचा समावेश असतो.

610

रेखा रात्रीचं जेवण संध्याकाळी 7.30 पर्यंत घेतात. तसेच हे जेवण आणि झोपण्याची वेळ यात किमान 2 तासांचं अंतर असेल याची त्या नेहमीच काळजी घेतात. याशिवाय त्या रोज स्किन क्लिंज, टोन आणि मॉइश्चराइज सुद्धा करतात.

710

रेखा रोज योगा आणि मेडिटेशन करतात. त्यांच्या सौंदर्याचं रहस्य योगा आणि त्यांचा स्पेशल डाएट प्लान असल्याचं त्या सांगतात.

810

2018 मध्ये रेखा यांनी आयफा अवॉर्डमध्ये धमाकेदार डान्स परफॉर्मन्स दिला होता. यासोबतच त्या वयाची 60 वर्ष पार केल्यानंतर डान्स परफॉर्मन्स करणाऱ्या पहिल्या अभिनेत्री ठरल्या.

910

70 व्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रेखा यांनी या क्षेत्रात 6 दशक पूर्ण केली आहेत. त्या शेवटच्या शमिताभ या सिनेमात दिसल्या होत्या. त्यानंतर 2018 मध्ये त्यांनी 'यमला पगला दिवाना फिर से' मध्ये स्पेशल अपियरन्स दिला होता.

1010

रेखा लवकरच पानिपत या बहुचर्चित सिनेमात दिसणार आहेत. या सिनेमात अभिनेता अर्जुन कपूर प्रमुख भूमिकेत आहे.

  • FIRST PUBLISHED :