दिग्गज गझलकार म्हणून पंकज उधास यांना ओळखलं जातं. आज ते आपला 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
पंकज उधास यांच्या अनेक गझल आजही लोकांना मंत्रमुग्ध करुन टाकतात.
पंकज उधास यांचा भलामोठा चाहतावर्ग आहे. त्यांचे चाहते त्यांना लाईव्ह ऐकण्यासाठी हवं ते करायला तयार असतात.
पण एका चाहत्याने त्यांच्यासोबत असं काही केलं की, त्याने अगदी घाबरवून सोडलं होतं.
एका चाहत्याने पंकज उधास यांना त्याच्या आवडीची गझल ऐकवण्याची फर्माईश केली होती.
काही कारणास्तव पंकज यांनी त्याला नकार देताच त्याने बंदूक काढून त्यांच्या डोक्याला लावली. त्यामुळे नाईलाजाने त्यांनी त्याला ती गझल. '
एकदा राजेंद्र कुमार यांच्या घरी जेवायला आले असता, पंकज उधास यांची 'चिठ्ठी आई है' ही गझल ऐकून राज कपूर यांना अश्रू अनावर झाले होते.