NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Mouni Roy B'day: 15 व्या वर्षी अभिनेत्रीने सुरू केलं करिअर; आज आहे कोट्यावधींची मालकीण

Mouni Roy B'day: 15 व्या वर्षी अभिनेत्रीने सुरू केलं करिअर; आज आहे कोट्यावधींची मालकीण

Mouni Roy Birthday Special In Marathi:आज मौनी रॉय आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी.

110

अभिनेत्री मौनी रॉय सध्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील आपल्या 'जुनून' या दमदार भूमिकेमुळे चर्चेत आहे. मौनीने प्रसिद्ध टीव्ही मालिका 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' ते 'ब्रह्मास्त्र' या अभिनयप्रवासात प्रचंड प्रसिद्धी मिळवली आहे. आज मौनी रॉय आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याबाबत काही खास गोष्टी.

210

मौनी रॉयने फक्त छोट्या पडद्यावरच नव्हे तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर 'ब्रह्मास्त्र' चित्रपटातील मौनीची भूमिका छोटी पण दमदार आहे.

310

या छोट्याशा भूमिकेत अभिनेत्रीने आपल्या अभिनयाने समीक्षक आणि चाहत्यांना भुरळ पाडली आहे. ही अभिनेत्री 28 सप्टेंबर 1985 रोजी कूचबिहारमध्ये जन्मली आहे.

410

मौनीला अभिनयाचा वारसा आपल्या घरातूनच मिळाला आहे. मौनीचे आजोबा शेखर चंद्र रॉय आणि आई मुक्ती हे प्रसिद्ध थिएटर कलाकार आहेत.

510

सेंट्रल स्कूलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर मौनीने जामिया मिलिया इस्लामियामध्ये मास कम्युनिकेशनमध्ये प्रवेश घेतला होता. परंतु शिक्षण पूर्ण करण्यापूर्वी ती मुंबईला निघून आली होती.

610

मौनी रॉय ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. 2007 मध्ये, तिने एकता कपूरच्या 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या शोमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. या मालिकेतून ती घराघरात पोहोचली होती.

710

मौनी रॉय टीव्ही शो, चित्रपट, जाहिरात, ब्रँड एंडोर्समेंट आणि सोशल मीडियातून करोडोंची कमाई करते. इतकंच नव्हे तर अभिनेत्री म्युझिक व्हिडिओंमधूनही भरपूर कमाई करते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मौनीची एकूण संपत्ती 40 कोटी रुपये इतकी आहे.

810

स्टायलिश आणि आलिशान आयुष्य जगणारी मौनी रॉय मुंबईत दोन अपार्टमेंटची मालकीण आहे.

910

मौनी रॉयला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे. अभिनेत्रीच्या कार कलेक्शनमध्ये मर्सिडीज जास्त आहेत. अभिनेत्रीकडे 1.5 कोटी रुपयांची मर्सिडीज जीएलएस 350 डी आणि 67 लाख रुपयांची मर्सिडीज बेंझ ई क्लास देखील आहे.

1010

मौनी रॉयने काही महिन्यांपूर्वी बिझनेसमॅन सूरज नांबियारशी लग्न केलं आहे. मौनी सध्या अभिनयासोबतच कौटुंबिक जीवनाचा आनंद घेत आहे.

  • FIRST PUBLISHED :