'गँग्स ऑफ वासेपुर'मधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी होय. हुमा आज आपला 36 वा वाढदिवस साजरी करत आहे.
या अभिनेत्रीने मोजक्याच परंतु दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपलं एक विशेष स्थान निर्माण केलं आहे. ही अभिनेत्री एक लक्झरी आयुष्य जगते.
अनेकांना अभिनेत्रीच्या लाइफस्टाइलबाबत आणि नेटवर्थबाबत जाणून घ्यायची उत्सुकता आहे. आज आपण याबाबतच जाणून घेणार आहोत.
हुमाचा जन्म दिल्लीमध्ये झाला आहे. तिचे वडील सलीम कुरैशी आहेत. ते दिल्लीतील जवळजवळ 10 रेस्टोरंटचे मालक आहेत. या क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे.
हुमाबाबत सांगायचं तर अभिनेत्री एका चित्रपटासाठी तब्बल 2 ते 3 कोटी रुपये मानधन घेते.
हुमाला महागड्या गाड्यांची प्रचंड आवड आहे.
अभिनेत्रीजवळ SUV लँड रोव्हर फ्रीलँडर, मर्सिडीज बेन्जसारख्या अनेक कार आहेत.
हुमाच्या एकूण संपत्तीबाबत सांगायचं झालं तर, अभिनेत्री तब्बल 23 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे..
हुमाचा भाऊ साकिब कुरेशी हासुद्धा एक अभिनेता आहे.