NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Arshad Warsi B'day: बालपणातच आईवडिलांना गमावलं, घरोघरी जाऊन विकल्या त्या वस्तू; भयानक होतं 'मुन्नाभाई' फेम सर्किटचं आयुष्य

Arshad Warsi B'day: बालपणातच आईवडिलांना गमावलं, घरोघरी जाऊन विकल्या त्या वस्तू; भयानक होतं 'मुन्नाभाई' फेम सर्किटचं आयुष्य

Happy Birthday Arshad Warsi: 'मुन्नाभाई एमबीबीएस'मधील सर्किट आजही सर्वांना आठवतो. ही भूमिका साकारली होती अभिनेता अरशद वारसीने.

18

'मुन्नाभाई एमबीबीएस'मधील सर्किट आजही सर्वांना आठवतो. ही भूमिका साकारली होती अभिनेता अरशद वारसीने.

28

आज अरशद वारसी आपला 55 वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्यासाठी आयुष्य वाटतं तितकं सोपं नव्हतं. पाहूया अभिनेत्याबाबत न ऐकलेल्या काही गोष्टी.

38

मुंबईत जन्मलेल्या अर्शद वारसीने अगदी लहान वयातच आपल्या आई-वडीलांना गमावलं होतं. आईबाबांच्या निधनानंतर अर्शनने त्याच्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.

48

आर्थिक परिस्थितीमुळे अभिनेत्याने दहावीनंतरच शिक्षण सोडलं आणि पैसे कमवण्यासाठी धडपड सुरु केली होती.

58

याकाळात अरशदने सेल्स मॅन म्हणून काम सुरु केलं होतं. अर्शदच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा त्याने कॉस्मेटिक कंपनीत काम करायला सुरुवात केली.

68

वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्याने घरोघरी जाऊन सौंदर्य प्रसाधने विकली आहेत.

78

अरशद वारसीने अमिताभ बच्चन यांच्या प्रॉडक्शन हाऊसचा चित्रपट 'तेरे मेरे सपने'मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती.पण हा सिनेमा फ्लॉप ठरला होता.

88

अरशद वारसीने आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपट केले, परंतु त्याला खरी ओळख 2003 साली आलेल्या संजय दत्तसोबतच्या 'मुन्नाभाई एमबीबीएस' या चित्रपटामधून मिळाली. या चित्रपटानंतर तो रातोरात स्टार बनला होता.

  • FIRST PUBLISHED :