अलका कुबल या मराठीतील प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आपल्या अनोख्या अंदाजाने लोकांच्या हृदयात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
बालपणापासूनच व्यावसायिक नाटकांमध्ये काम करणाऱ्या अलका यांनी मराठी चित्रपटांमध्ये मोठी ओळख निर्माण केली आहे. आज त्या आपला वाढदिवस साजरा करत आहेत . यानिमित्ताने त्यांच्याबाबत काही खास गोष्टी जाणून घेऊया.
अलका कुबल यांनी इयत्ता दहावीत असताना 'चक्र' या मराठी चित्रपटात एक लहान भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांनी अनेक लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत.
अलका कुबल यांना 'माहेरची साडी' या चित्रपटातून खास ओळख मिळाली होती. हा चित्रपट प्रचंड गाजला होता.
अलका कुबल यांच्या खाजगी आयुष्याबाबत सांगायचं तर त्यांनी एका मुलाखतीमध्ये आपल्या वीक पॉईंटचा उल्लेख केला होता.
एका मुलाखतीमध्ये अलका यांनी सांगितलं होतं की, 'काठपदरच्या साड्या' हा त्यांचा वीक पॉईंट आहे. त्यांना अशा साड्या प्रचंड आवडतात.
प्रत्येक सणाला किंवा कोणत्याही कार्यक्रमाला त्या आवर्जून काठपदरच्या साड्या नेसण्याला प्राधान्य देतात.
तसेच अलका कुबल यांच्याकडे पैठणी आणि कांजीवरम साड्यांचं मोठं कलेक्शन असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.