बॉलिवूड अभिनेता गोविंदाची भाची आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आरती सिंगबाबत एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आरती सिंगसोबत एक फारच विचित्र अपघात घडला आहे.
अभिनेत्री आपल्या मित्रांसोबत डिनरसाठी एका रेस्टोरंटमध्ये पोहोचली होती. त्याठिकाणी हा अपघात घडला.
आरती मित्रांसोबत जेवणाचा आनंद दरम्यान काचेचा एक ग्लास फुटून त्या काचा अभिनेत्रीच्या हातात घुसल्या.
या काचा इतक्या मोठ्या प्रमाणात अभिनेत्रीच्या हाताला लागल्या की तिला रुग्णलयात ऍडमिट करावं लागलं होतं.
आरतीच्या हातातून तब्बल 7 काचेचे तुकडे निघाले होते. तिच्या हाताला जवळजवळ सहा टाके पडले आहेत.
या सर्व प्रकारात आपल्याला प्रचंड त्रास झाल्याचं आरती सांगते. सध्या ती घरी आली असून तिची प्रकृती उत्तम आहे.