आज सर्वत्र 'गोकुळाष्टमी' मोठ्या उत्साहात साजरी केली जात. सर्व सामान्य लोकांपासून ते सेलिब्रेटींपर्यंत सर्वच श्रीकृष्णाच्या भक्तीत रमले आहेत.
भगवान विष्णूचा आठवा अवतार समजल्या जाणाऱ्या भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव आज साजरा होत आहे.
सध्या सोशल मीडियावर एका अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.
या फोटोमध्ये त्या अभिनेत्रीला ओळखणंही कठीण झालं आहे. कारण तिने श्रीकृष्णाच्या रुपात आपलं हे फोटोशूट करुन घेतलं आहे.
ही अभिनेत्री इतर कुणी नसून 'रात्रीस खेळ चाले' फेम शेवंता अर्थातच अपूर्वा नेमळेकर आहे.
अपूर्वा नेमळेकरने अतिशय मनमोहक असे फोटो शेअर करत चाहत्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अपूर्वा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले नवनवीन फोटो शेअर करुन चाहत्यांचं लक्ष वेधत असते.
अभिनेत्री लवकरच 'द डिलिवरी बॉय' या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.