सध्या एका गाण्याची प्रचंड क्रेझ सुरु आहे, ते गाणं म्हणजे 'जाने बलमा घोडे पे क्यूँ सवार है'.
हे गाणं आजकाल इन्स्टाग्रामच्या प्रत्येक रील्स आणि व्हिडिओंवर ऐकायला मिळत आहे. या गाण्याने सर्वांनाच भुरळ घातली आहे.
अभिनेत्री तृप्ती डिमरीने या गाण्यामध्ये अभिनय केला आहे. हे गाणं 'कला' या चित्रपटातील आहे.
मात्र या गाण्यामागे आवाज कोणचा आहे माहितेय का? या गाण्याची गायिका कोण? असा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो हे सध्या सर्वांच्या तोंडात असलेलं हे गाणं गायिका सिरीशा भागवतुलाने गायिल आहे.
सिरीशा 'इंडियन आयडॉल १२' मध्ये सहभागी झाली होती. यामध्ये तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती.
विशाखापट्टणम, आंध्रप्रदेशची राहणारी सिरीशा अभ्यासातसुद्धा प्रचंड हुशार आहे. ती एक टॉपर आहे.
इतकंच नव्हे तर सिरीशा एक गोल्ड मेडल विजेतीदेखील आहे.