अभिनेता गश्मिर महाजनीचे वडिल ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रवींद्र महाजनीच्या मृत्यूनंतर त्यांच्याविषयी अनेक माहिती समोर येत आहे.
गश्मिर महाजनीनं कुटुंबासोबत अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र वडिलांसोबत त्यानं एकही फोटो शेअर केला नाही.
आईसोबतचं त्याचं जिव्हाळ्याचं नातं वारंवार पहायला मिळतं. तो आईसोबत अनेक फोटोही शेअर करत असतो. मात्र वडिलांसोबत आई एवढं खास नातं नाही.
गश्मिर त्याच्या वडिलांचा कधी जास्त उल्लेखही करत नाही.
गश्मिर आईसोबत मुंबईत रहायचा तर वडिल रवींद्र महाजनी पुण्यात तळेगाव येथे भाड्याने रहायचे.
सध्या रवींद्र महाजनी यांच्या जाण्यानं मराठी सिनेसृष्टीवर मोठी शोककळा पसरली आहे.