आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन वर्षात कोरोनामुळे प्रत्येक सणावर अनेक बंधने होती. परंतु यावर्षी सर्वत्र मोठ्या उत्साहात गणरायाचं आगमन आलं आहे.
मात्र अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यंदा गणेशोत्सव साजरा करणार नाहीय. ती पहिल्यांदाच गणपती बसवणार नाहीय.
काही दिवसांपूर्वी सोनालीची आजी या जगातून निघून गेली होती.
त्यामुळे यावर्षी सोनालीच्या घरी गणपती बाप्पा विराजमान होणार नाहीत.
अभिनेत्रीने एक भावुक पोस्ट लिहत याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान अभिनेत्रीने आपले जुने फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये सोनाली गणेशोत्सव साजरा करताना दिसून येत आहे.
अभिनेत्रीने पुढच्या वर्षी तितक्याच श्रेद्धेने गणेशोत्सव साजरा करणार असल्याचंही म्हटलं आहे.