दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर बॉलिवूड सिनेतारकांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. सर्व कलाकार मंडळी सलमान खानची बहीण अर्पिता शर्माच्या घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली होती. यावेळी सलमान खानही उपस्थित होता. तर शिल्पा शेट्टीच्या घरी गणपतीच्या दर्शनासाठीही अनेक स्टार्सही जमले होते. गणेशोत्सवाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये गणेशाच्या दर्शनासाठी कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी एकत्र आलेले दिसून आलं.
बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग बासू, आनंद एल राय आणि मुकेश भट्ट हे टी-सीरीजच्या गणपती पूजेला पोहोचले होते.
अभिनेता नील नितीन मुकेशने आपल्या घरी गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. फोटोमध्ये नील नितीन मुकेश त्याच्या कुटुंबासह दिसत आहेत.सर्वांनी पारंपारिक पोशाख परिधान केला आहे.
कतरिना कैफ आणि विकी कौशल सलमान खानची बहीण अर्पिता आयुष शर्माच्या वांद्रे येथील घरी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले होते.
जेनेलिया आणि रितेश देशमुख मुलांसह अर्पिता आणि आयुषच्या घरी पोहोचले होते.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानही आपल्या बहिणीच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचला होता.
सोहेल खानसुद्धा आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांच्यासोबत दिसून आला.
तर रविना टंडन आपल्या लेकीसोबत शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली होती.
अभिनेत्री श्रद्धा कपूर आपल्या मावशी आणि अभिनेत्री पद्मिनी आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांच्यासोबत नातेवाईकांच्यात दिसून आली.
यावेळी श्रद्धा कपूरच्या ट्रॅडिशनल अंदाजाने सर्वांचं मन जिंकलं आहे.