गणेशोत्सवाची धामधूम सुरु आहे. आज आपल्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. आपल्या लाडक्या मराठी कलाकारांच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाला आहे.
मराठी अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी देखील बाप्पाचं आगमन झालं आहे.
बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री वीणा जगतापच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. वीणाने बाप्पासोबत फोटो शेयर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
टाईमपास फेम अभिनेता प्रथमेश परबनेदेखील बाप्पासोबत फोटो शेयर करत सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
जय मल्हार फेम अभिनेता देवदत्त नागे यांनसुद्धा गणपती बाप्पानां घरी आणलं आहे. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी मास्क घालत कोरोना नियमांचं भान ठेवलं आहे.
अभिनेत्री श्वेता महाडिकनेसुद्धा आपल्या बाप्पासोबत फोटो शायर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
'तुझी माझी रेशीमगाठ' मालिकेतील गोड परी म्हणजेच मायराच्या घरीदेखील बाप्पा विराजमान झाले आहेत.
'जीव माझा गुंतला' फेम श्वेता अर्थातच प्राजक्ता नवनाळेच्या घरीसुद्धाबाप्पा विराजमान झाले आहेत.