लाखो चाहत्यांची प्रतीक्षा संपली....अखेर बॉलीवूडची सर्वात सुंदर दिवा कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाचा पहिला फोटो समोर आला आहे. बॉलीवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री कतरिना विकी कौशल यांच्या लग्नाची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. आता तो क्षण आला आहे जेव्हा कतरिनाचा ब्राइडल लुक सर्वांसमोर आला आहे.
कतरिनाने तिच्या इन्स्टावर काही फोटो शेअर केले आहेत. दोघ देखील खुप सुंदर आणि आनंदात दिसत आहेत.
कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे लग्नबंधनात अडकले आहेत. आज राजस्थानमधील सवाई माधोपूरच्या चौथ का बरवडामध्ये या जोडप्याने एकमेकांना पती-पत्नी म्हणून स्वीकारले आहे. लग्नानंतर या कपलचे पहिले फोटो समोर आले आहेत.
लाल रंगाच्या ड्रेसमध्ये कतरिना खूपच सुंदर दिसत आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफचे लग्न अनेक अर्थाने खास होते. या जोडप्याने त्यांच्या लग्नाची तयारी अगदी गुप्त ठेवली होती.
या फोटोंमध्ये कतरिना आणि विकीचे लग्न राजेशाही थाटात झाल्याचे दिसत आहे.
वधू-वर बनलेल्या कतरिना-विकीचे फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले. ऑफ व्हाइट शेरवानीमध्ये विकी हॅण्डसम दिसत होता. या जोडीची पहिली झलक पाहायला मिळाल्याने चाहते खूपच खूश आहेत.
राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरबडा येथे कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी शाही पद्धतीने लग्न केले. सात फेरे घेऊन या जोडप्याने एकमेकांचा कायमचा हात हातात घेतला आहे.
कतरिनाच्या रॉयल वेडिंगने चाहत्यांच्या मनात घर केले आहे आणि जेव्हा जेव्हा बॉलीवूडच्या सर्वात मोठ्या आणि भव्य विवाहसोहळ्यांचा नाव निघेल तेव्हा सर्वात आधी कतरिना-विकीच्या लग्नाची आठवण होईल असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
या फोटोंमध्ये कतरिना आणि विकीचे लग्न राजेशाही थाटात झाल्याचे दिसत आहे.