यंदाच्या फेमिना मिस इंडियाला आपली विजेती मिळाली आहे.
अवघ्या १९ वर्षांची नंदिनी गुप्ता फेमिना मिस इंडिया बनली आहे.
राजस्थानची रहिवाशी असणारी नंदिनी ५९ वी फेमिना मिस इंडिया ठरली आहे.
यावेळी नंदिनीला माजी फेमिना मिस इंडिया सिनी शेट्टीने मुकुटू चढवला.
इतक्या कमी वयात इतका मोठा 'किताब आपल्या नावावर केल्याने नंदिनीचं कौतुक होत आहे.
नंदिनी आता पुढे मिस वर्ल्डमध्ये देशाचं प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे.
नंदिनीने बिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे.
नंदिनी बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राला आपली आयडल मानते.
हा दिमाखदार सोहळा मणिपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता.
यामध्ये देशभरातील मुलींनी सहभाग घेतला होता.