NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Father's Day 2020 : वडिलांची लाडाची लेक होती माधुरी, शेवटच्या क्षणापर्यंत होती सोबत

Father's Day 2020 : वडिलांची लाडाची लेक होती माधुरी, शेवटच्या क्षणापर्यंत होती सोबत

माधुरीचे वडील शंकर दीक्षित यांचं 2013 मध्ये निधन झालं. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासाठी माधुरी हेच सर्वस्व होतं. Father's Day निमित्त या लोकप्रिय अभिनेत्रीचे वडिलांबरोबरचे Rare Photos

19

बॉलिवूडच्या प्रस्थापित कलाकारांपैकी खूप कमी जण कुठलीही सिनेमाची पार्श्वभूमी नसताना या क्षेत्रात आलेले आहेत. त्यापैकी माधुरी दीक्षित ही एक. माधुरीला या अनोळखी क्षेत्रात आल्यापासून घरच्यांचा विशेष करून तिच्या वडिलांचा पाठिंबा मिळाला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी पाय रोवून इथे उभी राहू शकले, असं माधुरी सांगते..

29

अशी ही सर्वांची लाडकी माधुरी तिच्या आई- वडिलांच्या काळजाचा तुकडा होती. माधुरीचे वडील शंकर दीक्षित यांचं 2013मध्ये निधन झालं. पण शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्यासाठी माधुरी हेच सर्वस्व होतं. आजही माधुरी तिच्या आईसोबत अनेकदा मराठी नाटकांना जाताना दिसते.

39

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित नुकतीच ‘कलंक’ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. तब्बल 20 वर्षांनंतर ती या सिनेमातून संजय दत्तसोबत स्क्रीन शेअर केली.

49

या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर संमिश्र प्रतिसाद मिळाला असला तरी अनेकांना माधुरीची भूमिका पसंत पडली. या सिनेमात तिने बहार बेगन नावाची व्यक्तिरेखा साकारली होती. 30 वर्षांहून अधिक काळ बॉलिवूडमध्ये आपल्या नावाचा डंका गाजवणाऱ्या माधुरीच्या सिनेकरिअरबद्दल तर सारेच जाणतात.

59

सोशल मीडियावर तिच्या सिनेमांबद्दल आणि सिनेमाशी निगडीत इतर अनेक घटनांबद्दल माहिती उपलब्ध असते. तिच्या सिनेकरिअरबद्दल जेवढं लोकांना माहीत आहे त्याहून कमी तिच्या खासगी आयुष्याबद्दल माहीत आहे.

69

आज आम्ही तुम्हाला माधुरीचे तिच्या आई- वडिलांसोबतचे काही दुर्मिळ फोटो दाखवणार आहोत. हे फोटो पाहून तुम्हाला 90 चं दशक आणि माधुरीचा तो सुवर्णकाळ आठवल्याशिवाय राहणार नाही.

79

शंकर आणि स्नेहलता दीक्षित यांची माधुरी हे चौथं आपत्य. माधुरीला दोन मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे.

89

अंधेरीच्या डिवाइन चाइल्ड हायस्कूलमध्ये माधुरीचं शालेय शिक्षण झालं. शाळेत शिकत असतानाच माधुरीने आठ वर्ष कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं.

99

माधुरीने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा जेव्हा निर्णय घेतला तेव्हा तिच्या आई- वडिलांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. त्यांच्या याच पाठिंब्यामुळे बॉलिवूडला धकधक गर्ल मिळाली.

  • FIRST PUBLISHED :