बॉलिवूडच्या लोकप्रिय गायकांपैकी एक म्हणजे गायिका हर्षदीप कौर. हर्षदीपचा आज वाढदिवस असून ती 36 वा वाढदिवस साजरा करत आहे.
हर्षदीप कौरचा जन्म 16 डिसेंबर 1986 रोजी दिल्लीत झाला. हर्षदीप कौरचे वडील सविंदर सिंग यांचे दिल्लीत वाद्ययंत्राचे दुकान आहे.
हर्षदीप कौरने वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षापासून गायन शिकण्यास सुरुवात केली. हर्षदीप कौरने शास्त्रीय तसेच पाश्चात्य संगीतात प्राविण्य आहे. तिने दिल्ली म्युझिक थिएटरमधून वेस्टर्न म्युझिकचे प्रशिक्षण घेतलंय.
हर्षदीपने हिंदीशिवाय पंजाबी, तमिळ, मल्याळम आणि उर्दूमध्येही गाणी गायली आहेत.
'रंग दे बसंती' चित्रपटातील 'इक ओंकार' आणि 'कांतियां करूं', 'दिलबरों' हे गाणे गाऊन हर्षदीपने सर्वांची मने जिंकली आहेत. तर दुसरीकडे हर्षदीपची 'जुगनी', 'नचदे ने सारे', 'जालिमा', 'वारी बरसी', 'चोंच बॅटल' ही गाणी लोकांच्या ओठावर असतात.
आपल्या आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका हर्षदीप तिच्या खास पेहरावामुळेही ओळखली जाते.
हर्षदीप पगडी घालून परफॉर्म करताना दिसते. 'जुनून कुछ कर दिखाना का' या स्पर्धेत हर्षदीपला डोकं झाकून गाणं म्हणायचं होतं, ते धार्मिक कारणांसाठीही आवश्यक होतं असं म्हटलं जातं. त्यामुळे तिने स्कार्फने डोके झाकण्याचा निर्णय घेतला, पण तिच्या जवळच्या व्यक्तीने तिला पगडी घालून जाण्याचा सल्ला दिला.
शोच्या वातावरणानुसार, हर्षदीप लांब सूफी पोशाख घालायची आणि सोबत एक पग घालायची. हा शो जिंकल्यानंतर ही पगडी तिचा पोशाखाचा एक भाग बनली जी आजही आहे.