NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / PHOTOS: कित्येक वर्षानंतर या मराठी कलाकारांनी TVवर केलंय कमबॅक

PHOTOS: कित्येक वर्षानंतर या मराठी कलाकारांनी TVवर केलंय कमबॅक

मराठी चित्रपटांमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयाची सुरवात टीव्ही मालिकांमधून केली. मात्र नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये मोठी प्रसिद्धी मिळवली. आता हेच कलाकार पुन्हा एकदा मालिकांकडे वळले आहेत.

111

मराठी चित्रपटांमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अभिनयाची सुरवात टीव्ही मालिकांमधून केली. मात्र नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये मोठी प्रसिद्धी मिळवली. आता हेच कलाकार पुन्हा एकदा मालिकांकडे वळले आहेत. मराठीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी मालिकांमध्ये पुनरागमन केलं आहे.

211

अभिनेता अंकुश चौधरीने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. बऱ्याच वर्षानंतर त्याने 'मी होणार सुपरस्टार' या शोमधून छोट्या पडद्यावर पुन्हा एन्ट्री केली आहे.

311

ज्येष्ठ अभिनेता विजय कदम यांनी अनेक वर्षांनंतर झी मराठीवरील 'ती परत आलीय' या मालिकेतून पुनरागमन केलं आहे.

411

अभिनेत्री प्रार्थना बेहरेने 'पवित्र रिश्ता' या हिंदी मालिकेतून आपली मन जिंकली होती. त्यांनतर ती चित्रपटांकडे वळली होती. आत्ता पुन्हा एकदा ती 'तुझी माझी रेशीमगाठ' मालिकेतून परत आली आहे.

511

अभिनेता उमेश कामतसुद्धा 'अजूनही बरसात आहे' या मालिकेतून टीव्हीवर परत आला आहे.

611

अभिनेत्री मुक्ता बर्वेनेसुद्धा टीव्हीवर पुनरागमन केलं आहे. उमेश कामतसोबत 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत ती झळकली आहे.

711

मराठी अभिनेता भूषण प्रधान 'जय भवानी जय शिवाजी' या ऐतिहासिक मालिकेतून छोट्या पडद्यावर परतला आहे.

811

तर काही महिन्यांपूर्वी भरत जाधव यांनीसुद्धा 'सुखी माणसाचा सदरा' या मालिकेतून टीव्हीवर पुन्हा एन्ट्री केली होती.

911

अभिनेता श्रेयस तळपदेसुद्धा छोट्या पडद्यावर परतला आहे. प्रार्थना बेहरेसोबत 'तुझी माझी रेशीमगाठ' या मालिकेत श्रेयस दिसणार आहे.

1011

अभिनेता सिद्धार्थ चांदेकरनेसुद्धा 'सांग तू आहेस का?' मालिकेतून टीव्हीवर पुनरागमन केलं होतं.

1111

तर ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णीसुद्धा ;स्वराज्य जननी जिजामाता' मालिकेतून टीव्हीवर परतल्या होत्या.

  • FIRST PUBLISHED :