मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर आपल्या बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते.
सई नेहमीच हटके लूकमध्ये नवनवीन फोटोशूट करत असते. तिच्या प्रत्येक लूकची जोरदार चर्चा होत असते.
दरम्यान सई ताम्हणकरने पुन्हा एकदा असंच एक झक्कास फोटोशूट केलं आहे. या फोटोंमुळे ती सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.
सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये ती निळ्या रंगाच्या लॉंग शिफॉन गाऊनमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे.
पण सईचा हा लूक काही नेटकऱ्यांना रुचलेला दिसून येत नाहीय.
त्यामुळे त्यांनी सईच्या या लुकवर प्रतिक्रिया देत, 'आम्हाला दुसरी उर्फी नको आहे', उर्फीची बहीण, उर्फीच्या दिशेने वाटचाल', अशा अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
सई ताम्हणकरचे चाहते मात्र तिच्या या लुकवर जोरदार लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत.