अनेक स्टार किड्स असे आहेत ज्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करून आपलं स्थान निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. मात्र काही स्टार किड्स आहेत, जे परदेशात राहून आपलं शिक्षण पूर्ण करत आहेत. आपण अशाच काही स्टार किड्सबद्दल जाणून घेणार आहोत.
या लिस्टमध्ये सर्वात आधी नाव येत शाहरुख खानची लेक सुहानाचं. ती न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत आहे. तसेच ती थिएटरमध्ये खूपच सक्रीय आहे.
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची कन्या ख़ुशी कपूरसुद्द्धा न्यूयॉर्कच्या एका इंस्टिट्यूटमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत आहे.
अजय देवगन आणि काजोल यांची लेक न्यासा देवगन सिंगापूरच्या यूनायटेड वर्ल्ड कॉलेज ऑफ साउथ ईस्ट आशियामध्ये आपलं शिक्षण घेत आहे. मात्र अनेक रिपोर्टनुसार तीसुद्धा आपल्या आईवडिलांप्रमाणे अभिनयात आपला लक अजमावणार आहे.
मिथुन चक्रवर्ती यांची कन्या दिशानी हीसुद्धा न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचं शिक्षण घेत आहे.
सैफ अली खानचा मुलगा इब्राहीम सध्या लंडनमध्ये शिकत आहे. सैफच्या मते इब्राहीमला अभिनयापेक्षा जास्त दिग्दर्शनामध्ये रस आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान कॅलिफोर्नियामध्ये दिग्दर्शन आणि अभिनयाचं शिक्षण घेत आहे.
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा युनायटेड किंगडमच्या सेवानोक्स स्कुलमध्ये शिक्षण घेऊन आता न्यूयॉर्कच्या फोर्डहम युनिव्हर्सिटीमध्ये शिकत आहे.