गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. त्यातच चिंता वाढवणाऱ्या बातम्यादेखील समोर येत आहेत. अशातच बी टाऊनमध्येही कोरोनाने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. हिंदी सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटीज कोरोना पॉझिटीव्ह आढळली आहेत. दरम्यान, आता बॉलिवू़डमध्ये आत तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
निर्माती एकता कपूरला आज कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.
बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) आणि त्याची पत्नी प्रिया यांनादेखील कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने ही माहिती दिली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिला कोरोनाची लस घेऊन देखील कोरोनाची लागण झाल्याची आहे. तिनं सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे. ती योग्या ती काळजी देखील घेत आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) कोरोनाची लागण झाली आहे.28 डिसेंबरला अभिनेत्रीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. नोरा सध्या क्वॉरंटाईनमध्ये आहे. ती सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहे.
काही दिवसापूर्ली अर्जुन कपूर, अंशुला कपूरला देखील कोरोनाची लागण झाली आहे. दोघेही सध्या क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
सोनम कपूरची बहिण रिया कपूर हिला देखील कोरोनाची लागण झाली आहे. ती उपचार व योग्य ती काळजी घेत आहे.
तिसऱ्या लाटेत चर्चेत नाव आलं ते करीन कपूर खानचे. करीनाला देखील करण जोहरच्या पार्टीतून कोरोनाची लागण झाली होती. आता ती बरी झाली आहे.
करीनाची मैत्रीण अमृता अरोरा देखील या पर्टीत होती. तिला देखील कोरोनाची लागण झाली होती.
करणच्या या पार्टीत संजय कपूरची पत्नी देखील होती. महीप कपूरला देखील कोरोनाची लागण झाली होती. यानंतर करण जोहर, आलिया भट्ट यांनी कोरोना टेस्ट केली होती. त्यांची टेस्ट निगेटिव्ह आली.
सोहेल खानची पत्नी सीमा खान हिला देखील या तिसऱ्या लाटेत कोरोनाची लागण झाली होती. आता यातील काही सेलेब्स बरे झाले आहेत. तर काही उपचार घेत आहेत.