बिझनेस मॅगझिन फोर्ब्ज (Forbes) ने 2020 या वर्षासाठी सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांची (Forbes List of Highest Paid Male Actors)यादी जाहीर केली आहे. यामध्ये सलग दुसऱ्या वर्षी द रॉक ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson)चे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. टॉप 10 च्या या यादीमध्ये बॉलिवूडचा खिलाडी 'अक्षय कुमार' देखील आहे.
WWE रेसलर आणि हॉलिवूड अभिनेता द रॉक ड्वेन जॉनसन (Dwayne Johnson )ने कमाईच्या शर्यतीमध्ये सर्वांना मागे टाकले आहे. फोर्ब्सच्या सर्वात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये तो पहिल्या क्रमांकावर आहे. जून 2019 ते जून 2020 या वर्षामध्ये द रॉकची कमाई 87.5 मिलियन डॉलर्स अर्थात जवळपास 6.54 अब्ज रुपये इतकी आहे.
यानंतर दुसऱ्या क्रमांकावर रेयान रेनॉल्ड्स (Ryan Reynolds)आहे. रेयानची कमाई 71.5 मिलियन डॉलर आहे.
तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या मार्क वालबर्ग (Mark Wahlberg) ची यावर्षातील कमाई 58 मिलियन डॉलर आहे.
यानंतर काहीशा फरकाने बेन एफलेक (Ben Affleck) चौथ्या स्थानावर आहे. त्याची कमाई 55 मिलियन डॉलर आहे.
54 मिलियन डॉलर कमाई असणारा विन डीजल (Vin Diesel) पाचव्या स्थानावर आहे.
फोर्ब्सच्या या यादीमध्ये एकमेवर बॉलिवूड कलाकार आहे, तो म्हणजे अक्षय कुमार. अक्षय कुमारची जून 2019 ते जून 2020 मधील कमाई 48.5 मिलियन डॉलर (जवळपास 362.78 कोटी) इतकी आहे. अक्षय गेल्यावर्षी या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर होता. यावर्षी तो सहाव्या क्रमांकावर आहे.
लिन मॅन्युएल मिरांडा (Lin-Manuel Miranda)ची कमाई 45.5 मिलियन डॉलर असून तो सातव्या क्रमांकावर आहे.
आठव्या क्रमांकावर विल स्मिथ (Will Smith)असून त्याची कमाई 44.5 मिलियन डॉलर आहे.
यानंतर अॅडम सँडलर (Adam Sandler)आहे. त्याची कमाई 41 मिलियन डॉलर आहे.
फोर्ब्जच्या या यादीमध्ये जॅकी चेन (Jackie Chan) दहाव्या क्रमांकावर आहे. त्याची कमाई 40 मिलियन डॉलर आहे.