अजय देवगण आणि तब्बू स्टारर 'दृश्यम 2' ची सध्या जोरदार क्रेझ पहायला मिळत आहे. सोबत चित्रपटातील कलाकारही प्रेक्षकांची मने जिंकत आहे.
'दृश्यम 2'मध्ये अजय देवगणच्या लेकीची भूमिका साकारलेली अभिनेत्री इशिता दत्ताही सध्या जोरदार चर्चेत आहे.
इशिताने नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटोशूट शेअर केलं आहे. यामध्ये इशिताचा साडीतील ग्लॅमरस अंदाज चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.
इशिताने लेटेस्ट फोटोशूटमध्ये मल्टिकलर साडी नेसली आहे. यासोबतच तिनं शेअर केलेल्या पोस्टच्या कॅप्शननेही अनेकांचं लक्ष वेधलं आहे.
'स्वतःच्याच प्रेमात पडले', असं कॅप्शन इशिताने तिच्या पोस्टला दिलं आहे.
काही क्षणातच अजयच्या ऑन स्क्रीन लेकीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
चाहते फोटोंवर भरभरुन कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत.
इशिताने अनेक टीव्ही मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.