देशभरात सध्या दिवाळीची धूम सुरु आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते सेलेब्रेटींपर्यंत सर्वजण हा सण मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.
फक्त देशातच नव्हे तर देशाबाहेर असणाऱ्या भारतीयांनीसुद्धा विदेशात मोठ्या उत्साहात दीपोत्सव साजरा केला आहे.
यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रासुद्धा मागे नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रियांका चोप्राने पती एक जोनससोबत दिवाळी साजरी केली आहे.
यंदाची दिवाळी प्रियांका आणि निक जोनाससाठी फारच खास होती. कारण ही दिवाळी त्यांची लाडकी लेक मालती मेरी चोप्रा जोनसची पहिली दिवाळी आहे.
प्रियांकाचा पती आणि हॉलिवूड अभिनेता निक जोनसने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत.
शेअर केलेल्या या फोटोंमध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा पती निक जोनस आणि त्यांची लेक मालती यांनी एकसारखे कपडे परिधान केले आहेत.
प्रियांका आणि निक लग्नानंतर दरवर्षी विदेशात मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात. यामध्ये अनेक लोक सहभागी झालेले पाहायला मिळतात.
फक्त दिवाळीच नव्हे तर दसरा, रंगपंचमी, गणेशोत्सव असे सगळे सण प्रियांका आणि निक जोडीने विदेशात साजरे करतांना दिसून येतात.