देश-विदेशात मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. प्रत्येक घर दिव्यांनी उजळून निघालं आहे.
दिवाळी सेलिब्रेशनमध्ये बॉलिवूड कलाकारसुद्धा मागे नाहीत. दिवाळीच्या आधीच बॉलिवूडमध्ये दिवाळी पार्ट्यांचं आयोजन करण्यात आलं होतं.
कोरोना महामारीनंतर प्रथमच यंदा आलिशान दिवाळी पार्ट्या पार पडल्या. यामध्ये अनेक सेलेब्रेटींनी हजेरी लावली होती.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफनेसुद्धा प्रत्येक दिवाळी पार्टीत पती-अभिनेता विकी कौशलसोबत दिवाळी पार्टीत उपथिती लावली होती.
दिवाळी पार्टीत कतरिना कैफचा लुक चर्चेचा विषय ठरला होता. एका पार्टीमध्ये अभिनेत्रीने सुंदर अशी लाल रंगाची साडी परिधान केली होती.
कतरिना कैफपेक्षा ही लाल रंगाची साडी प्रचंड चर्चेत आहे. याचं कारणसुद्धा तितकंच खास आहे.
कतरिना कैफने दिवाळी पार्टीसाठी नेसलेली साडी तिच्या किंमतीमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीची ही साडी थोडी-थोडकी नव्हे तब्बल 70 हजारांची होती.
कतरिना कैफ सतत अशा महागड्या साड्या आणि ड्रेस परिधान करत असते. तिचा फॅशन सेन्स अनेकांना प्रचंड पसंत पडतो.