NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Diwali 2022: अमिताभ बच्चन यांनी कुटुंबासोबत प्रतिक्षावर केलं लक्ष्मीपूजन; ऐश्वर्या-आराध्याने वेधलं लक्ष

Diwali 2022: अमिताभ बच्चन यांनी कुटुंबासोबत प्रतिक्षावर केलं लक्ष्मीपूजन; ऐश्वर्या-आराध्याने वेधलं लक्ष

Amitabh Bachchan Diwali Puja:दिवाळी सुरु होण्याआधीच बॉलिवूड सेलिब्रिटींनीं दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. कोरोना महामारीमुळे गेल्या काही वर्षात सर्वांनाच दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटता आलेला नव्हता. तब्बल दोन वर्षांनंतर सर्वसामान्य लोकांसोबतच सेलिब्रेटींनी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली.

18

दिवाळी सुरु होण्याआधीच बॉलिवूड सेलिब्रिटींनीं दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं. कोरोना महामारीमुळे गेल्या काही वर्षात सर्वांनाच दिवाळीचा मनसोक्त आनंद लुटता आलेला नव्हता. तब्बल दोन वर्षांनंतर सर्वसामान्य लोकांसोबतच सेलिब्रेटींनी दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली.

28

बॉलिवूडमध्ये कुणी आपल्या घरी पार्टीचं आयोजन केलं होतं. तर कुणी पार्टीत सहभागी होत पार्टीची शोभा वाढवली होती. बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन यांनीही दिवाळीनिमित्त त्यांच्या प्रतीक्षा बंगल्यात लक्ष्मीपूजन केलं.

38

यादरम्यान बिग बी आपल्या संपूर्ण कुटुंबासह म्हणजेच पत्नी जया बच्चन, लेक अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांच्यासोबत पाहण्यात आले.

48

दुसरीकडे, त्यांची मुलगी श्वेता बच्चन आणि नात नव्या नवेली नंदाही पूजेला उपस्थित होत्या. अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्याजवळील हे फोटो विरल भयानीने शेअर केले आहेत.

58

अमिताभ बच्चन संपूर्ण कुटुंबासह प्रतीक्षावर एकाच कारमध्ये पोहोचले, ज्याचे फोटोही समोर आले आहेत. यामध्ये अभिषेक बच्चन कार चालवताना दिसून येत आहे.

68

अभिषेकच्या शेजारी अमिताभ बच्चन बसले आहेत. तर पाठीमागे जया बच्चन, ऐश्वर्या आणि आराध्याही कारमध्ये आहेत. या सर्वांचा पारंपरिक लुक लक्ष वेधून घेत आहे.

78

तर दुसरीकडे अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा आणि नात नव्या नंदा यांनी एकमेकांना मॅचिंग असा पोशाख परिधान केला होता.

88

यंदा अमिताभ बच्चन यांनी आपल्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं नव्हतं. यावेळी त्यांनी कुटुंबासोबतच दिवाळी साजरी करण्याला पसंती दिली आहे.

  • FIRST PUBLISHED :