बॉलिवूड कलाकारांप्रमाणेच मराठी कलाकारसुद्धा अगदी थाटामाटात दिवाळी साजरी करत आहेत. मराठी कलाकारांचे पारंपरिक लुक्स सर्वांना भुरळ पाडत आहे.
'माझ्या नवऱ्याची बायको' आणि 'तुझेच मी गीत गात आहे' फेम अभिनेता अभिजित खांडकेकरनेसुद्धा मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली.
अभिजित खांडकेकरची पत्नी आणि अभिनेत्री सुखदा खांडकेकरने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये अभिजित आणि सुखदा आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करताना दिसत आहेत.
या फोटोंमध्ये सुखदाने सुंदर अशी बांधणी पैठणी साडी परिधान केली आहे. तर अभिजितने कुर्ता पायजमा घातला आहे.
पारंपरिक कपडे आणि दागिने सुखदासौंदर्यात आणखीनच भर पाडत आहेत. या लुकमध्ये सुखदा फारच सुंदर दिसत आहे.
यंदाची दिवाळी अभिजित आणि सुखदासाठी फारच खास आहे. कारण हे दोघे आपल्या नव्या घरात पहिली दिवाळी साजरी करत आहेत.
काही महिन्यांपूर्वी सुखदा आणि अभिजितने मुंबईत नवं घर खरेदी केलं आहे. त्यांनी पारंपरिक पद्धतीने गृहप्रवेशदेखील केला होता.