मराठी अभिनेता सुव्रत जोशी आणि अभिनेत्री सखी गोखले हे 'दिल दोस्ती दुनियादारी' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचले होते.
एकाच मालिकेतून प्रसिद्धीस आलेल्या आणि सह कलाकार असलेल्या सखी आणि सुव्रतची लव्हस्टोरीसुद्धा तितकीच हटके आहे.
सखी आणि सुव्रत यांची पहिली भेट 'दिल दोस्ती दुनियादारी' या मालिकेच्या सेटवरच झाली होती. त्याआधी ते एकमेकांना फेसबुकवरुन ओळखत होते.
परंतु मालिकेत एकत्र काम करत असताना त्यांची खुप चांगली मैत्री झाली. पुढे 'अमर फोटो स्टुडियो' या नाटकात त्यांनी एकत्र काम केलं.
या नाटकादरम्यानच दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर सखी शिक्षणासाठी लंडनला गेली. याच दरम्यान दोघांमध्ये रिलेशनशिप असल्याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. परंतु सखी किंवा सुव्रत दोघांनीही यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती.
11 एप्रिल 2019 रोजी त्यांनी लग्न करत चाहत्यांना एकच धक्का दिला. अचानक त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले त्यामुळे प्रेक्षकांना आणि त्यांच्या चाहत्यांना आनंदाचा धक्का बसला होता.
मुंबई जवळच्या सगुणाबाग मध्ये त्यांचा विवाह पार पडला होता. जवळचे मित्र आणि नातेवाईक अश्या मोजक्याच लोकांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. त्यानंतर मुंबईत मोठ्या दिमाखात रिसेप्शनही पार पडलं होतं.