NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / उतावळ्या पोपटलालचं होणार लग्न? ग्लॅमरस तरुणीनं हातात गुलाब घेऊन केलं प्रपोज

उतावळ्या पोपटलालचं होणार लग्न? ग्लॅमरस तरुणीनं हातात गुलाब घेऊन केलं प्रपोज

तारक मेहतामधील पत्रकार पोपटलालचं नशीब चमकलं; तरुणीनं स्वत:ला घातली लग्नाची मागणी

110

तारक मेहता का उल्टा चष्मा हा छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय विनोदी शोंपैकी एक म्हणून ओळखला जातो. जबरदस्त पटकथा आणि अभिनय यामुळं गेली 13 वर्ष सातत्यानं ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

210

तारक मेहतामधील सर्वच व्यक्तिरेखा लोकप्रिय आहेत. परंतु यामध्ये पत्रकार पोपटलाल हा मात्र खऱ्या अर्थानं सर्वांचं लक्ष वेधून घेतो.

310

या मालिकेत गेली अनेक वर्ष तो लग्न करण्याचा प्रयत्न करत आहे. अगदी उतावळा नवरा गुढग्याला बाशिंग अशी त्याची अवस्था आहे.

410

आजवर अनेकदा त्याचं लग्न होता होता मोडलं आहे. त्यामुळं प्रेक्षक देखील पोपटलालचं लग्न कधी होणार हा प्रश्न वारंवार निर्मात्यांना विचारत आहेत.

510

पण कदाचित याचं उत्तर लवकरच मिळेल अशी शक्यता आता निर्माण झाली आहे. कारण मालिकेत एका तरुणीनं थेट पोपटलालला लग्नासाठी प्रपोज केलं आहे.

610

पोपटलाल सध्या औषधांची काळाबाजारी रोखण्यासाठी एका रिसॉर्टमध्ये आलाय. सध्या तो या अनधिकृत व्यवसायाविषयी पुरावे गोळा करत आहे.

710

दरम्यान याच रिसॉर्टमधील एका तरुणीनं पोपटलालला लग्नासाठी मागणी घातली आहे. तिचे प्रपोज करतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

810

यामुळं आता तरी पोपटलालचं लग्न होणार की पुन्हा एकदा तो लग्नाशिवायच राहणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

910

काही प्रेक्षकांच्या मते हे केवळ नाटक आहे. पोपटलालला लग्नाचं आमिष दाखवून फसवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची शक्यता आहे.

1010

तर काही प्रेक्षकांच्या मते पोपटलालच त्या तरुणीला लग्नाचं आमिष दाखवून फसवणार, आता नेमकं काय घडणार हे येत्या भागांमध्ये प्रेक्षकांना कळेल.

  • FIRST PUBLISHED :