NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / श्वेताच्या साडीचं 'लागीर झालं जी'च्या जीजींशी आहे खास कनेक्शन, शेअर केली भावूक पोस्ट

श्वेताच्या साडीचं 'लागीर झालं जी'च्या जीजींशी आहे खास कनेक्शन, शेअर केली भावूक पोस्ट

अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदेचं (Shweta shinde photoshoot) साडीतील फोटोशूट सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये घातलेली साडी श्वेतासाठी खूप खास आहे. याच्यासोबत काही खास आठवणी श्वेतानं शेअर केल्या आहेत.

110

अभिनेत्री श्वेता शिंदेनं अभिनय आणि निर्मीती दोन्ही क्षेत्रात चांगलं नाव कमावलं आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.

210

नुकतंच श्वेतानं साडीमध्ये फोटोशूट केलं आहे. हे फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. श्वेतानं नेसलेल्या साडीची एक विशेष गोष्ट आहे आणि त्याविषयी तिनं सांगितलं आहे.

310

श्वेताला ही साडी लागिरं झालं जी या मालिकेतील जीजी म्हणजेच अभिनेत्री कमल ठोके यांनी दिली होती. याविषयी श्वेतानं म्हटलं की, ही साडी देताना त्या मला म्हणाल्या होत्या... "एकदा तरी नेसशील ना ही साडी?" मला ह्या साडीत पाहण्याची त्यांची खूप इच्छा होती.

410

खरतर ही साडी नेसून, छान तयार होऊन मला त्यांच्यबरोबरच फोटोज् काढायचे होते पण तो योग कधी आलाच नाही...त्यापूर्वीच जीजी आपल्याला सोडून गेल्या. पण त्यांनी दिलेली ही साडी आजही मला त्यांच्या मायेची ऊब देते, असं भावूक होत श्वेतानं म्हटलं .

510

जीजींनी माझ्याकडे पाहिलं की नेहमी त्यांच्या डोळ्यात मला माझं कौतुकच दिसायचं. मी साताऱ्याची आणि त्या कऱ्हाडच्या असल्यामुळे त्यांना नेहमी माझ्याबद्दल एक वेगळाच अभिमान असायचा आणि दरवेळी त्या हे बोलूनही दाखवत. मी, ही साडी म्हणजे जीजींनी मला दिलेला आशीर्वाद आणि त्यांच्या माझ्यावरील अमाप प्रेमाची आठवण समजते, असंही पुढे श्वेता म्हणाली.

610

तुमची ही आठवण मी नक्कीच आयुष्यभर स्वतःकडे जपून ठेवणार आहे. जीजी, आज तुम्ही इथे माझ्याबरोबर नाही आहात पण मी नक्कीच सांगू शकते की, तुम्ही जिथे कुठे असेल तिथुन मला पाहत असाल आणि या साडीत मला पाहून तुम्हालाही खूप आनंद होत असेल.

710

इन्स्टाग्रामला हे फोटो शेअर करत श्वेतानं एक भावूक पोस्ट लिहिली आहे. याची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.

810

'लागिरं झालं जी' या मालिकेची निर्मीती श्वेता शिंदेनं केली होती. या मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला.

910

लागिरं झालं जी, सध्या सुरू असलेल्या देवमाणूस आणि देवमाणूस2 या मालिकांची निर्मिती देखील श्वेता शिंदेनं केली आहे.

1010

श्वेता शिंदेनं जीजी म्हणजे कमल ठोकेंसाठी लिहिलेली भावूक ही पोस्ट व्हायरल होत आहे.

  • FIRST PUBLISHED :