बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस काही महिन्यांपूर्वी आईबाबा बनले आहेत. या दोघांनी जानेवारीमध्ये सरोगेसीद्वारे आपल्या लेकीला जन्म दिला आहे.
जन्माच्या 4 महिन्यांनंतरही अजून प्रियांका चोप्राने आपल्या लेकीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाहीय. किंवा लेकीचं नावसुद्धा उघड केलेलं नाहीय.
अभिनेत्रीच्या चाहत्यांना तिच्या बाळाचा चेहरा पाहण्याची फारच उत्सुकता आहे. तसेच प्रियांकाच्या लेकीचं नाव काय असणार याबद्दलही विशेष कुतूहल आहे.
दरम्यान आता प्रियांका चोप्राच्या मुलीच्या नावाबद्दल मोठा खुलासा झाला आहे. पाहूया नेमकी कोणती माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, प्रियांका चोप्राच्या लेकीचं नाव समोर आलेलं आहे. TMZ च्या रिपोर्टनुसार, प्रियांकाच्या मुलीचं नाव 'मालती मेरी चोप्रा जोनस' असं आहे.
TMZ ने प्रियांका चोप्राच्या मुलीचा जन्मदाखला आपल्या हाती लागल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हा विषय सध्या प्रचंड चर्चेत आहे.
प्रियांका आणि निकच्या या लेकीचा जन्म 15 जानेवारी रोजी सरोगेसीद्वारे झाला होता. प्रियांका आणि तिच्या पतीने सोशल मीडियावर पोस्ट लिहीत याबद्दलची माहिती दिली होती.
प्रियांका आणि निकच्या मुलीच्या या नावातून त्यांनी दोन्ही संस्कृतीचा आदर करत आपल्या मुलीचं नाव ठेवल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.