NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / दीपिका पदुकोणची शाळेतील प्रगती सोशल मीडियावर VIRAL, पाहा काय म्हणाला रणवीर!

दीपिका पदुकोणची शाळेतील प्रगती सोशल मीडियावर VIRAL, पाहा काय म्हणाला रणवीर!

दमदार अभिनयाच्या जोरावर फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड सुद्धा गाजवणाऱ्या दीपिकाची शाळेतली प्रगती कशी होती हे या मार्कलिस्टमध्ये दिसत आहे.

17

दीपिका पदुकोण आज बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये गणली जाते. दमदार अभिनयाच्या जोरावर तिनं फक्त बॉलिवूडच नाही तर हॉलिवूड सुद्धा गाजवलं. मात्र तुम्हाला माहित आहे का बॉलिवूडची मस्तानीची शाळेतील प्रगती कशी होती.

27

दीपिकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत ज्यात तिच्या शिक्षकांनी तिला दिलेले रिमार्क दिसत आहेत. दीपिकाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत.

37

रिल आणि रियल लाइफमध्ये बोल्ड आणि बिनधास्त म्हणून ओळखली जाणारी दीपिका शाळेत मात्र खूप बोलकी होती. याचा पुरावा या तिनेच शेअर केलेल्या रिमार्कशीट्सवर मिळाला आहे.

47

दीपिकाच्या शिक्षकांनी ती वर्गात खूप जास्त बोलत असल्याचा रिमार्क दिला आहे. दीपिकानं हा फोटो शेअर केल्यानंतर रणवीरनं त्यावर 'ट्रबर मेकर' अशी कमेंट केली आहे.

57

दीपिकाच्या दुसऱ्या एका रिमार्कशीटवर तिच्या शिक्षकांनी लिहीलं, दीपिका दिवसा स्वप्न पाहते. आता हे किती खरं आणि किती खोट हे दीपिकालाच माहित.

67

दीपिकानं सुचना पाळायला हव्यात असाही एक रिमार्क तिला मिळाला आहे. यावर रणवीरनं, 'मी तुमच्याशी सहमत आहे टीचर' अशी कमेंट केली आहे.

77

रणवीर आणि दीपिका बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत राहणारी जोडी आहे. हे दोघं नेहमीच एकमेकांच्या फोटोवर कमेंट करताना दिसतात. 6 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दीपवीर मागच्यावर्षी लग्नाच्या बेडीत अडकले.

  • FIRST PUBLISHED :