NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / रणवीर सिंह नव्हे तर 'या' खास व्यक्तीसोबत दीपिका पादुकोण पोहोचली व्हेनिस,घेतेय सुट्टीचा आनंद

रणवीर सिंह नव्हे तर 'या' खास व्यक्तीसोबत दीपिका पादुकोण पोहोचली व्हेनिस,घेतेय सुट्टीचा आनंद

बॉलिवूड मस्तानी अर्थातच अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या पोस्ट्सद्वारे ती चाहत्यांना प्रत्येक अपडेट देत असते.नुकतंच अभिनेत्रीने आपले काही खास फोटो शेअर केले आहेत.

18

बॉलिवूड मस्तानी अर्थातच अभिनेत्री दीपिका पादुकोण सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आपल्या पोस्ट्सद्वारे ती चाहत्यांना प्रत्येक अपडेट देत असते.नुकतंच अभिनेत्रीने आपले काही खास फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती रणवीर नव्हे तर दुसऱ्याच खास व्यक्तींसोबत व्हेकेशनवर जाताना दिसत आहे.

28

नुकतंच, अभिनेत्री पती रणवीर सिंहला सोडून तिची आई उज्जला पादुकोण आणि बहीण अनिशा पादुकोणसह व्हेनिसला पोहोचली आहे. तिने चाहत्यांसह संध्याकाळचे दुर्मिळ फोटो शेअर केले आहेत.

38

दीपिका तिच्या कुटुंबावर किती प्रेम करते हे तिच्या चाहत्यांना चांगलेच माहीत आहे. आई-वडिलांना भेटण्यासाठी ती अनेकदा पुण्याला जात असते. अलीकडेच ती तिची आई आणि बहिणीसोबत सुट्टी घालवण्यासाठी इटलीतील प्रसिद्ध कॅनाल सिटी व्हेनिस येथे पोहोचली आहे.

48

अभिनेत्रीने व्हेनिसमधील सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

58

या फोटोमध्ये दीपिकाने चेहऱ्यावर मास्क लावलेला आहे. अनिशा राखाडी रंगाच्या पोशाखात कॅमेऱ्याकडे पाहत पोज देताना दिसून येत आहे. तर आई उज्जला काळ्या रंगाच्या पोशाखात सुंदर दिसत आहेत. या तिघी एयरपोर्टच्या लाउंजमध्ये बसलेल्या दिसत आहेत.

68

या फोटोमध्ये दीपिकाने आपल्या ट्रॅव्हलिंग दरम्यानचं फूड शेअर केलं आहे. तर आणखी एका फोटोत तिने प्लेनमध्ये झोपलेल्या बहिणीचा गुपचूप सेल्फी काढला आहे.

78

आणखी एका फोटोमध्ये,दीपिकाने व्हेनिसच्या मध्यभागी असलेल्या डोगेचा राजवाडा, आणि राजवाड्याच्या आतील भागाची झलकदेखील शेअर केली आहे.

88

कॅनॉल राईड हा प्रवासाचा एकमेव मार्ग असल्याने, दीपिका पादुकोण आणि तिच्या कुटुंबाने फिरताना कॅनॉल राईडचा आनंद घेतला.

  • FIRST PUBLISHED :