'स्टार कपल' रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण नुकतेच अमेरिकेला जाऊन आले. रणवीरच्या वाढदिवसाचं औचित्य साधत दोघेही पर्सनल वेळ घालावायला व्हॅकेशनसाठी गेले होते.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगनं या व्हॅकेशचा फोटो अल्बम इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांचे चाहते कित्येक दिवसांपासून या फोटोंची वाट पाहत होते.
दीपिका, रणवीर दोघांनीही निसर्गरम्य ठिकाणी सोबत घालवलेला वेळ, पर्वतांमध्ये केलेलं गिर्यारोहण, सायकलिंग, समुद्रकिनाऱ्यावर मजा, अशा अनेक आठवणींचा अल्बम चाहत्यांसोबत शेअर केलाय. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या सगळ्यांचं लक्ष वेधत आहेत.
दोघांनीही रणवीरच्या वाढदिवसाचा चांगलाच आनंद लुटलेला पहायला मिळतोय.
रणवीर, दीपिकानं भन्नाट कॅप्शसह फोटो शेअर केले आहेत. फोटो आणि व्हिडीओंमधून दोघांचंही एकमेकांवरील प्रेम दिसून येतंय.
फोटो शेअर करताना रणवीरने लिहिलं, 'लव्ह टू लव्ह यू बेबी' यावरही चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.
'आपलं आयुष्य खूप साहसांनी आणि अनुभवांनी भरलेलं असावं' असं कॅप्शन दीपिकानं दिलं आहे.
रणवीर आणि दीपिकाने समुद्रकिनारी दोघांच्या पावलाचे ठसे उमटवल्याचा हा फोटो शेअर केलाय.
व्हॅकेशनदरम्यान दोघांनी लोकल ठिकाणी खाल्ल्याचं या फोटोवरुन पहायला मिळतंय.
दोघेही सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.