स्मृती मंधाना भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटर आणि 'नॅशनल क्रश' म्हणून ओळखली जाते.
स्मृतीने अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावर केले आहेत. जगभरात स्मृतीचा चाहतावर्ग आहे.
परंतु आता स्मृती आपल्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. ही महिला क्रिकेटर प्रेमात पडल्याचं गेल्या अनेक दिवसांपासून म्हटलं जात आहे.
स्मृती मंधाना बॉलिवूडची लोकप्रिय गायिका पलक मुच्छलच्या भावाला डेट करत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान आता स्मृतीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोघांचे फोटो शेअर करत पलकच्या भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पलाशसाठी पोस्ट लिहत स्मृतीने लिहलंय, 'या शुद्ध आत्म्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.. येणारं वर्ष खूप चांगलं जावो'.
या पोस्टवरुन पुन्हा एकदा स्मृती आणि पलाशच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं आहे.
काही दिवसांपूर्वी स्मृतीने पलक मुच्छलचासुद्धा वाढदिवस साजरा केला होता.