छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांमधील एक म्हणजे CID होय. ही मालिका जवळजवळ 20-25 वर्षे टीव्हीवर चालली होती.
या मालिकेतून एसीपी प्रद्युमन, दया, अभिजित, फ्रेड्रिक घराघरात पोहोचले होते. यामध्ये एसीपीची भूमिका मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांनी साकारली आहे.
शिवाजी साटम यांच्याबाबत तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु फारच कमी लोकांना त्यांच्या मुलाबाबत आणि सुनेबाबत माहिती आहे.
शिवाजी साटम यांचा मुलगा अभिजित साटम हासुद्धा एक अभिनेता आहे.
अभिजित साटमने 'हापूस' सारख्या मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे.
त्यांच्या सुनेबाबत सांगायचं तर शिवाजी साटम यांची सून मराठीतील गाजलेली अभिनेत्री आहे.
अभिनेत्री मधुरा वेलणकर ही त्यांची सून आहे. मधुरा ही ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांची लेक आहे.
शिवाजी साटम यांना आपलं खाजगी आयुष्य लाइमलाईटपासून दूर ठेवायला आवडतं. त्यामुळेच फारच कमी माध्यमांसमोर येतात.