NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / मालिकेत डाॅ. आंबेडकरांचं बालपण साकारणारा अभिनेता आहे कोण?

मालिकेत डाॅ. आंबेडकरांचं बालपण साकारणारा अभिनेता आहे कोण?

स्टार प्रवाहावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मालिका सुरू झालीय. सध्या छोट्या आंबेडकरांची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचं कौतुक होतंय.

  • -MIN READ

    Last Updated: May 21, 2019, 18:34 IST
16

स्टार प्रवाहावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मालिका सुरू झालीय. सध्या छोट्या आंबेडकरांची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराचं कौतुक होतंय.

26

हा आहे अमृत गायकवाड. अमृत मूळचा नाशिकजवळच्या घोटी गावातला. लहानपणापासूनच त्याला अभिनयाची~आवड आहे. फावल्या वेळात गाणी ऐकणं हा त्याचा आवडता छंद.

36

मालिकेसाठी जेव्हा ऑडिशन सुरू होती तेव्हा अमृतला त्याबद्दल कळलं आणि त्याने थेट ऑडिशनचं ठिकाण गाठलं. त्याचा उत्साह आणि हजरजबाबीपणा भाव खाऊन गेला आणि अमृतची छोट्या आंबेडकरांच्या भूमिकेसाठी निवड झाली.

46

बाबासाहेबांच्या पत्नीची म्हणजेच रमाबाईंची भूमिका साकारणार आहे अभिनेत्री शिवानी रांगोळे. ऐतिहासिक भूमिका करायची तिची पहिलीच वेळ.

56

अभिनेता सागर देशमुख या मालिकेत मोठेपणीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारत आहे. या भूमिकेविषयी सांगताना तो म्हणाला, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका साकारणं माझ्यासाठी नवं आव्हान असणार आहे. बाबासाहेबांचं कर्तृत्व खरंच महान आहे. या भूमिकेच्या निमित्ताने मला नव्याने आंबेडकर उलगडत आहेत.'

66

पुढे तो हेही म्हणाला, 'एक अभिनेता म्हणून मी श्रीमंत होतोय, असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही.’

  • FIRST PUBLISHED :