सेलिब्रेटी आणि त्यांची लाईफस्टाईल याबाबत चाहत्यांना नेहमीच कुतूहल असतं. त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घ्यायला चाहते नेहमीच उत्सुक असतात.
त्यातीलच एक सेलिब्रेटी म्हणजे मराठमोळी श्रेया बुगडे होय. 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून श्रेया बुगडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.
लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. श्रेयाच्या लहान-लहान गोष्टी जाणून घ्यायला लोकांना आवडतं.
श्रेया आपल्या कॉमेडी अंदाजासोबतच आपल्या आलिशान लाईफस्टाईलसाठीही ओळखली जाते.
सध्या श्रेया आपल्या व्हॅनिटी व्हॅनमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.
श्रेयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या व्हॅनिटीमधील एक फोटो शेअर केला आहे.
अभिनेत्रीच्या व्हॅनिटी व्हॅनमधील इंटेरिअर डिझाईन अतिशय सुंदर आहे. यामध्ये श्रेया स्क्रिप्ट वाचत बसलेली दिसून येत आहे.
श्रेयाची व्हॅनिटी व्हॅन पाहून चाहते भरभरुन कमेंट्स करत आहेत.