'चला हवा येऊ द्या' या विनोदी कार्यक्रमाच्या माध्यमातून श्रेया बुगडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे.
महाराष्ट्राला खळखळून हसवणाऱ्या श्रेया बुगडेचा मोठा चाहतावर्ग आहे.तिच्या चाहत्यांना तिच्याबाबत जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता असते.
श्रेया बुगडेने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपली एक पोस्ट शेअर केली आहे.
ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आली आहे. कारणही तसंच खास आहे.
श्रेया बुगडेने पहिल्यांदाच नाक टोचलं आहे. अभिनेत्रीने आपल्या नव्या नोजपिनचे फोटो शेअर केले आहेत.
या नव्या लुकमध्ये श्रेयाच्या सुंदरतेत आणखीनच भर पडत आहे.
या फोटोवर कमेंट्स करत श्रेयाची खास मैत्रीण आणि अभिनेत्री अभिज्ञाने म्हटलंय, ''नेहमीसारखीच सुंदर', तर मनवा नाईकने म्हटलंय, 'लुक्स गुड'.
श्रेयाच्या या फोटोंवर चाहते आणि सेलेब्रेटी भरभरून लाईक्स आणि कमेंट्स करत आहेत.