'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून लोकांना पोट धरून हसायला भाग पाडणारी श्रेया बुगडे नेहमीच चर्चेत असते.
श्रेया बुगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपल्या व्यावसायिक आणि खाजगी पोस्ट शेअर करत असते.
श्रेया नेहमीच आपल्या पतीसोबत सुट्टीचा आनंद घेताना आणि धम्माल करताना दिसून येते.
आजसुद्धा श्रेयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत.
श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती कारमध्ये तर काही फोटोंमध्ये ती एका मॉलमध्ये दिसून येत आहे.
यामध्ये श्रेयाचा पतीसुद्धा सोबत आहे. यावेळी अभिनेत्रीने व्हाईट टी शर्ट आणि शॉर्ट डेनिम घातली आहे. तसेच डोळ्यावर सन ग्लासेससुद्धा कॅरी केले आहेत.
श्रेयाने फोटो शेअर करत, 'इन्स्टाग्राम व्हर्सेस रिऍलिटी' असं कॅप्शन दिलं आहे.