'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात पोहोचलेला अभिनेता आणि विनोदवीर म्हणजे भाऊ कदम होय.
भाऊ कदम एक साध्या स्वभावाची व्यक्ती आहे. ते सतत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत असतात. त्यांना 4 मुली आहेत.
त्यातील मोठी मुलगी म्हणजे मृण्मयी कदम होय.ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
मृण्मयी स्वतः एक व्हिडिओ क्रिएटर आणि युट्युबर आहे.शिवाय तिने उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवत 'TA रुंध्या' नावाचं स्वतः चं हेअर बो ब्रँड लॉन्च केलं आहे.
एका सुपरस्टारची लेक असूनसुद्धा मृण्मयीने स्वतः ची एक खास ओळख निर्माण केली आहे.
ती सतत आपल्या आई वडिल आणि बहिणींसोबतचे फोटो शेअर करत असते.
मृण्मयी फारच स्टाईलिश आहे.तिच्या इन्स्टाग्रामवर तिचे अनेक ग्लॅमरस फोटो पाहायला मिळतात.
मृण्मयीचं आपल्या बाबांसोबत फारच खास बॉंडिंग आहे.